This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

State

*गांजा वाहतूकप्रकरणी कोल्हापुरातील एकाला अटक*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

निपाणी, ता. २२ गांजा वाहतूक प्रकरणी येथे बुधवारी एका संशयिताला निपाणी शहर पोलिसांनी अटक केली. अक्षय उर्फ पिंटू अनिल कांबळे (वय २५, रा. सयाजी मळा, कावळा नाका परिसर कोल्हापूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. संशयित कांबळे यांच्याकडून पोलिसांनी दीड लाख रुपयाचा ४३० ग्रॅम गांजा तर २५ हजार रुपयांची दुचाकी असा एक लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

मंडल पोलिस निरीक्षक बी. एस. तळवार यांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी कोल्हापूरहून एक जण निपाणीच्या दिशेने गांजाची वाहतूक करणार असल्याची माहिती निपाणी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आज एक जुना पीबी रोड, मुरगुड रोड परिसरात सापळा रचला. दरम्यान दुचाकीवरून संशयित अनिल कांबळे जात असताना  त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केल्यावर त्याच्याकडे ४३० ग्रॅम गांजा आढळून आला.

कांबळे यांच्याकडून गांजा सह मोटरसायकल जप्त करून त्याला अटक करण्यात आली. दीड लाख रुपये किमतीचा गांजा दुचाकी असा जवळपास लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शेखर असोदे, एस. एस. तारवाड, गोपाळ बडीगेर, सुदर्शन अस्की यांनी कारवाई प्रकरणात भाग घेतला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now