This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

State

*एका मद्यधुंद पर्यटकाने भर रस्त्यात जाणारी येणारी वाहने अडवून नाच करून घातला धिंगाणा* .

*एका मद्यधुंद पर्यटकाने भर रस्त्यात जाणारी येणारी वाहने अडवून नाच करून घातला धिंगाणा* .
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव गोवा मार्गावरील चोर्ला घाटात एका मद्यधुंद पर्यटकाने भर रस्त्यात जाणारी येणारी वाहने अडवून नाच करून धिंगाणा घातला.
बेळगाव गोवा मार्गावरील चोर्ला येथे धबधबे आणि निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक येत आहेत.प्रवाहित झालेले धबधबे, दाट धुके आणि डोळ्यांना सुखावणारी हिरवाई याचा आनंद घेण्यासाठी कर्नाटक,महाराष्ट्रातून पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत.

अशा वेळी एका मद्यधुंद पर्यटकाने भर रस्त्यात नाचण्यास सुरुवात केली.मद्याचा अंमल चढलेला असल्याने दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनांची त्याला बिलकुल फिकीर नव्हती.रस्त्यात झोपून देखील त्याने आपल्या नृत्य कौशल्याचे दर्शन घडवले.ब्रेक डान्सचा आविष्कार देखील त्याने उपस्थित पर्यटकांना घडवला.
मद्यधुंद अवस्थेतील पर्यटकाच्या नृत्यामुळे पर्यटकांना निष्कारण मनस्ताप सहन करायला लागला.एका दुचाकी चालकाने त्याच्या अंगावर गाडी घातल्यासराखे केले पण तरीही तो बाजूला झाला नाही.मद्यपीच्या बेधुंद नृत्यामुळे पर्यटकांना आणि वाहन चालकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला.

धो धो पाऊस पडत होता पण त्याची तमा न बाळगता मद्यधुंद पर्यटकाने भर रस्त्यात धिंगाणा घातला.मुसळधार पावसामुळे बेळगाव आणि परिसरातील अनेक ठिकाणी धबधबे प्रवाहित झाले आहेत. वर्षा ऋतूतील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी अनेक ठिकाणाहून पर्यटक येत आहेत.पण अशा मद्यधुंद पर्यटकांमुळे रंगाचा बेरंग होतोय.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24