आॕपरेशन मदत ग्रूप आणि कनसू सेवा न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व निसर्ग संवर्धन सहल. –
कनसु सेवा न्यास व आॕपरेशन मदत ग्रूपच्या वतीने खानापूरच्या दुर्गम भागातील बेटणे आश्रमात येथे 500 पश्चिम घाटातील स्थानिक प्रजातीच्या रोपांची (वृक्षारोपण) लागवड केली.
गुरूपोर्णिमेच्या निमित्ताने बेळगावचे जेष्ठ पर्यावरणीय कार्यकर्ते डाॕ शिवाजी कागणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कनसु सेवा न्यास व आॕपरेशन मदत ग्रूपच्या वतीने खानापूरच्या दुर्गम भागातील बेटणे आश्रमात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
येथे पश्चिम घाटात वाढणाऱ्या स्थानिक प्रजातीच्या जवळपास 500 रोपांची लागवड करण्यात आली. बेटण्यातील सदर आश्रमाचे ठिकाण गाठण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जंगलातील 3/4 किलोमीटर उंचसखल निसरड्या पायवाटेने व रक्तपिपासू जळवांच्या वाटेवरून जवळपास अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ कार्यकर्ते राहूल पाटील यांच्या नेतृत्वाखाली मार्गक्रमण केले. जाता-येताना एक-दोन कार्यकर्ते घसरून पडले देखील ! काहीजणांनाच्या पायावर चढून जळवां (कांट) चिकटल्याने नंतर रक्त पिलेले दिसत होते,
त्या काढून टाकल्या. या वृक्षारोपणाच्यावेळी गिरीश व्होरा, अशोक के मूल्या, डी गणेश मारकल हे कनसू संघटनेचे जेष्ठ पदाधिकारी आणि मयुर शिंदोळकर (इंडस्ट्रियलिस्ट), तसेच मंजुनाथ मूल्या, बसवाज भावी, राघवेंद्र कुलाल, रवी कुलाल, हरीश मेत्री, शरथ पुजारी, हरीश मूल्या, गणेश मूल्या, अभिजीत कणबर्गी, विजय मूल्या, बी अशोक पुजारी, जगदीश मूल्या, गिरीश एच आर, मंजुनाथ हांडा, सुदर्शन देसाई, उदय शेट्टी, राघवेंद्र पुजारी, दिनेश पुजारी, महेश व किरण पुजारी हे बेळगांव शहरात व्यवसायानिमित्त राहणाऱ्या दक्षिण कर्नाटकीय कनसू या संस्थेचे मान्यवर व्यवसायिक सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्व सदस्यांनी आश्रमातील आयुर्वेदीय काढ्याचे प्राशन केलं व सोबत आणलेला अल्पोपहार घेतला.