हिडकल जलाशयामध्ये जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांना गेल्या 50 वर्षांपासून अजूनही भरपाई मिळाली नसल्याने आज आक्रमक पवित्रा घेत शेतकऱ्यांनी पाटबंधारे खात्याच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
याआधी शेतकऱ्यांनी अनेकवेळा जमिनीचा मोबदला न मिळाविण्याबाबत पाठपुरावा केला होता.तसेच अनेक निवेदनही दिले होते मात्र पाtबंधारा खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने आज सर्व शेतकऱ्यांनी बैल जोडी सह शहरांमध्ये दाखल होत मोर्चा काढला.
यावेळी आक्रमक पवित्रा घेतलेल्या शेतकऱ्यांनी पाटबंधारे खात्याच्या कार्यालयात बैल जोडीसह प्रवेश केला. तसेच महिलांनी देखील दुसऱ्या बाजूने प्रवेश करत कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी महिलांनी अडवणूक केली.
त्यामुळे जोपर्यंत अधिकारी आपल्या मागण्या मान्य करणार नाहीत तोपर्यंत आम्ही कार्यालय मधून जाणार नाही असा पवित्र शेतकऱ्यांनी घेतला आणि कार्यालयामध्येच बैलांना बांधले.