कोलंबो (श्रीलंका) येथे आयोजित 23 ते 26 जुलै 2024 रोजी होणाऱ्या दिव्यांगांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील थ्रो बॉल स्पर्धेत भाग घेण्यासाठी बेळगांवहून स्पर्धक रवाना झाले. प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावरील थ्रो बॉल स्पर्धेत तीन संघाद्वारे सहभागी होण्यासाठी बेळगांव जिल्ह्यातील 7 दिव्यांग खेळाडूंची निवड ही खरोखर बेळगांव वासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
यामूळे बेळगांवच्या सामाजिक संघसंस्थाद्वारे दानशूर आपल्याला जमेल तितकी मदत करत आहेत. हे सर्व 7 खेळाडू आंतरराष्ट्रीय थ्रोबाॕल स्पर्धेसाठी बेळगावकरांच्या आशिर्वादाने व शुभेच्छा घेऊन सोमवारी 22 तारखेला सकाळी 10ः15 वाजता रेल्वेने बंगलोरला व तेथून श्रीलंकेला रवाना झालेत.
कोलंबो (श्रीलंका) होणाऱ्या आंतरराष्ट्रीय थ्रो बॉल स्पर्धेत प्रथमच सहभागी होणाऱ्या भारतीय संघातील बेळगावच्या 7 खेळाडूंना जितो युथ विंगने छोटीशी मदत व शुभेच्छा दिल्या आहेत.