भ्रूणहत्या आणि शिशु विक्री प्रकरणात अटक झालेल्या नकली डॉक्टरला जामीन मिळाल्यावर त्याचे हार घालून आणि पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आल्याची दुर्दैवी आणि निंदनीय घटना घडली. बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर गावात ही घटना घडली.
अब्दुल लाडखान असे या नकली डॉक्टरचे नाव आहे.
शिशु विक्री प्रकरणात त्याला बेळगावातील माळ मारुती पोलिसांनी अटक केली होती.भ्रूणहत्या प्रकरणात देखील कित्तूर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. कित्तूर पोलिसांनी केलेल्या चौकशीच्या वेळी त्याने अनेक गर्भपात केल्याच्या पापाची कबुली दिली होती.गर्भपात करून ते भ्रूण आपल्या फार्म हाऊसमध्ये पुरल्याची कबुली त्याने दिली होती.
प्रांताधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या उपस्थितीत फार्म हाऊसमध्ये पुरलेले भ्रूण बाहेर काढण्यात आले होते.नंतर पोलिसांनी हे भ्रूण तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.आरोग्य खात्याने त्याचा दवाखाना देखील सील केला आहे.असे असताना अब्दुल लाडखान याची जामिनावर सुटका झाल्यावर त्याचे पुष्पहार घालून आणि पुष्पवृष्टी करून स्वागत करण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.