बेळगांव:माजी सैनिक अभिरुद्धी सेवा संघ कंग्राळी बुद्रुक यांच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व बेळगांव ग्रामीणच्या आमदार व महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर या उपस्थिती होत्या.
माजी सैनिक अभिवृद्धी सेवा संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी पुष्पृष्टी करून मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांचे स्वागत केले. दीप प्रज्वलन व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पूजन मंत्री लक्ष्मीबाई हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर माजी सैनिक अभिरुद्धी सेवा संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन फित कापून करण्यात आले.
संघटनेचे अध्यक्ष रामू तारीहाळकर ,उपाध्यक्ष अरुण पाटील यांनी मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांचा शाल व पुष्पहार घालून सन्मान केला.
यानंतर कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायत अध्यक्ष कैसर जान बंदेनवाज सय्यद , काकती पोलीस स्टेशनचे सीपीआय उमेश सर, हिंडालको आदित्य ग्रुपचे एचआर हेड मयूर कृष्णा, ग्रामपंचायत पीडीओ गोविंद रंगाप्पागोळ, हिंडालको सीनियर मॅनेजर दिनेश नाईक, ग्रामपंचायत तलाठी दयानंद कुगजी ,ग्रामपंचायत सेक्रेटरी सी के तलवार, एडवोकेट सुधीर चव्हाण तसेच इतर ग्रामपंचायत सदस्यांचा व पत्रकार सदानंद चव्हाण दीपक सुतार यांचा शाल व पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला.
यावेळी मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की ही संघटना स्थापन करून तुम्ही एक चांगले कार्य केला आहे.सर्वजण संघटित रहा व संघटित होऊन काम करा तसेच संघटने करिता सैनिक भवन बांधून देण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी माजी सैनिक अभिरुद्धी सेवा संघ कंग्राळी बुद्रुकचे पदाधिकारी सदस्य व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.