अखिल भारतीय जंगम समाजाच्या वतीने हुबळीतील घटनेचा निषेध करण्यात आले यावेळी कत्तूर राणी सर्कल येथे जंगम समाजाच्या वतीने निदर्शने करून नेहाला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना केले.
कॉलेज आवारातच नेहा हिरेमठ याची मुस्लिम युवकांनी निर्घृण पणे हत्या केली तिच्यावर नऊ वेळा चाकूने वार केला. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद देखील झाली आहे तसेच त्या ठिकाणी कॉलेजच्या आवारात काही युवकाने फैयांझला ताब्यात घेतले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.
सर्व पुरावे असताना फयाज याला तातडीने शिक्षा झालीच पाहिजे कॉलेजच्या आवारात जर असे कृत्य घडत असल्यास कॉलेजमधील अन्य हिंदू युवती कशाप्रकारे सुरक्षित राहतील त्यांना संरक्षण मिळालेच पाहिजे अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.