चिकोडी तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा,दूधगंगा वेदगंगा नद्यांना पूर आल्याने अनेक पूल पाण्याखाली गेले असून पोलिसांनी बॅरिकेड्स लावून पुलावरून जाण्यास बंदी घातली आहे.पूरस्थिती मुळे लोकांनी आपली जनावरे सुरक्षित स्थळी नेण्यास प्रारंभ केला आहे.
सदलगा – बोरगाव, उगार – कुडची आणि इचलकरंजीच्या कडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे.नद्यांना पूर आल्यामुळे नदीकाठच्या गावातील लोकांनी आपली जनावरे सुरक्षितस्थळी हलवण्यास प्रारंभ केला आहे.काही मार्गावरील कर्नाटक महाराष्ट्र आंतरराज्य वाहतूक देखील बंद झाली आहे.कृष्णा नदीवरील कुडची – उगार पूल पाण्याखाली गेल्याने जमखंडी – मिरज आंतरराज्य वाहतूक बंद झाली आहे.
शिरदवाड इचलकरंजी मार्गावरील पुलावर पंचगंगा नदीचे पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
पुराच्या पाण्यामुळे दूधगंगा नदीत मगरीचे दर्शन झाल्यामुळे पाण्यात उतरू नये असे आवाहन पोलीस खात्याने केले आहे.बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी पूरस्थिती उदभवलेल्या भागाला भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांनी एन डी आर एफ टीम समवेत संवाद साधून आढावा घेतला.