श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बेळगाव च्या वतीने फाल्गुन वद्य तृतीया शके 1945 या हिंदू तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. हा सोहळा छ.शिवाजी उद्यान येथे पार पडला. यावेळी प्रारंभी प्रेरणा मंत्र म्हणून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक तसेच जलाभिषेक घालण्यात आला. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील तसेच शहर प्रमुख अनंत चौगुले यांच्या हस्ते पुष्पहार घालून महाराजांचे पूजन करण्यात आले.
तसेच सामूहिक आरती म्हणून महिलांच्या वतीने शिवरायांचा पाळणा म्हणण्यात आला. यावेळी प्रचारक हिरामणी मुचंडीकर यांनी शिवजयंती तिथीनुसारच का साजरी केली पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले तसेच बलिदान मासकाळात शेवटच्या दिवशी होणाऱ्या धर्मवीर मुखपादयात्रेत जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच यावेळी बोलताना प्रांतप्रमुख किरण गावडे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. उभे आयुष्य परकिय सत्ताना धूळ चारली. आणि हे हिंदवी स्वराज्य उभं केलं. मग अश्या राजांची आपण जयंतीही हिंदु तिथीनुसार च केली पाहिजे. गेली 25 वर्षे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या माध्यमातून आपण तिथीनुसार च जयंती साजरी करतो समाजाने ही तिथीनुसार च साजरी करावी. शिवजयंती तिथी ही धर्मवीर बलिदान मासात येते त्यामुळे तिथीनुसार जयंती यांच वेळेस केली पाहिजे.
गेले 20 दिवस आपण धर्मवीर बलिदान मास पाळत आहोत. त्यानिमित्त सांगली येथून येत्या काही दिवसात ती धर्मवीर ज्वाला बेळगाव येथे आणण्यात येईल. आणि दि.8 एप्रिल रोजी धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मुकपद यात्रा काढून विधिवत पूजनाने ती ज्वाला शांत करण्यात येईल. यासाठी आपण सर्वांनी जमायचे असे आवाहन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ते धर्मवीर संभाजी महाराज चौक अशी ही मुकपदयात्रा असणार आहे. यावेळी ध्येयमंत्राने पुजनाची सांगता करण्यात आली.
संपूर्ण पूजेचे पौरोहित्य रवी जोशी यांनी केले. यावेळी तालुका प्रमुख परशराम कोकितकर, विभाग प्रमुख किरण बडवणाचे, चंदू चौगुले, गजानन निलजकर,प्रमोद चौगुले, मारुती पाटील, राजू बिरजे, महेश जांगळे, गजानन पवार, अतुल केसरकर,अभिजित अष्टेकर, गजानन पाटील, अमोल केसरकर, विनायक कोकितकर, अजित जाधव, रामकृष्ण सुतार, युवराज पाटील,महेश गावडे, उदित रेगे, उमेश बिर्जे, गिरीश पाटील, विनायक कुंडेकर, शंकर भातकांडे, प्रवीण घागवे, बाळू सांगूकर, संतोष कुसाणे, अजित बांदेकर, सौरभ पाटील, प्रमिला पाटील, सुलोचना शिंदोळकर विद्या पाटील, ईशा निलजकर तसेच इतर महिला व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.