This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

State

*राजधानीत यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवी दिल्ली, 12: संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जयंती आज दोन्ही महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली.

कॉपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त रूपिंदरसिंग यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस तसेच, कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. प्रतिमा गेडाम व श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

नवमहाराष्ट्राचे शिल्पकार, यशवंतराव चव्हाण यांची जयंती महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली. परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहीली. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now