बेळगाव: सतत जिल्ह्यामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शनिवारी (27 जुलै) शाळा-पदवी पूर्व कॉलेजना सुट्टीची घोषणा केली आहे.
रामदुर्ग तालुका वगळता सर्व तालुक्यांतील सर्व अंगणवाडी केंद्रे, शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि पूर्व पदवी महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्याचा आदेश जारी केला आहे. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ही सुट्टी जाहीर करण्यात आली असून, या सुट्टीची भरपाई येत्या काही दिवसांत करण्यात यावी, असे त्यांनी या घोषणेत म्हटले आहे.