नीट परीक्षेत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस ला प्रवेश मिळवून देतो म्हणून फसवणूक करणाऱ्या आरोपीला मार्केट पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून रोख रक्कम,कॉम्प्युटर, लॅपटॉप,मोबाईल, क्रेडिट कार्ड,सिम कार्ड आदी जप्त केल्याची माहिती कायदा सुव्यवस्था विभागाचे पोलिस उपायुक्त रोहन जगदीश यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव अरविंद उर्फ अरुणकुमार (४३) असे असून तो मूळचा तेलंगणा राज्यातील आहे.मुंबई येथून पोलिसांनी त्याला अटक केली . नीट परीक्षेत कमी गुण मिळालेले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना अरविंद एम बी बी एस ला ॲडमिशन मिळवून देण्याचे आश्वासन देत होता.यासाठी त्याने बेळगावात कौंसिलींग सेंटर या नावाने ऑफिस थाटले होते.बेळगावात त्याने कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या कडून एक कोटी तीस लाखाहून अधिक रक्कम उकळली होती.ऑफिसमध्ये त्याने अशा विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी बोलण्यासाठी टेली कॉलर देखील नेमले होते.फसवणूक झालेल्या एका पालकाने पोलिसात तक्रार दिल्यावर हे प्रकरण उघडकीस आले.पोलिसांनी अरविंद याचा शोध सुरू केला पण तो सतत सिम कार्ड बदलत असल्याने त्याला पकडण्यात अडचणी येत होत्या.अखेर त्याच्या कार चालकाच्या लोकेशन वरून मार्केट पोलिसांनी त्याला मुंबई येथे जावून अटक केली.अरविंद हा एम बी ए असून विद्यार्थ्यांच्या कडून पैसे गोळा केल्यावर तो ऑफिस बंद करून गाव सोडून पलायन करायचा.मुंबईत देखील त्याने नव्यानेच ऑफिस सुरू केले होते.पण बेळगाव पोलिसांनी त्याला अटक केल्यामुळे मुंबईत कोणाची फसवणूक झाली नाही.अरविंद याच्यावर तेलंगणा,महाराष्ट्र,कर्नाटक आणि मध्य प्रदेश येथे देखील अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.त्याने विद्यार्थ्यांच्या कडून उकळलेली रक्कम कोट्यवधीच्या घरात असून पोलीस तपासात सगळ्या बाबी उघड होणार आहेत.
D Media 24 > Crime > *एम बी बी एस ला प्रवेश मिळवून देतो म्हणून फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक*
*एम बी बी एस ला प्रवेश मिळवून देतो म्हणून फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक*
Deepak Sutar15/07/2024
posted on
Leave a reply