बेळगाव, बेंगळूर, मंगळूर अंतिम फेरीत
विद्याभारती राज्य फुटबॉल स्पर्धा.
बेळगाव ता,25 माळमारुती येथील स्पोर्टिंग प्लॅनेट टर्फ मैदानावर संतमीरा इंग्रजी शाळा अनगोळ आयोजित विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती राज्यस्तरीय मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या विविध गटात बेंगळूर ,मंगळूर, बेळगांव जिल्ह्यातील संघाने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
प्राथमिक मुलांच्या 14 वर्षाखालील गटात पहिल्या उपांत्य सामन्यात शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर बेळगांवने धारवाडचा 2-0 असा पराभव केला, तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात आरव्हीके बेंगळूर संघाने शारदा विद्यालय मंगळूरचा 3-0 असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
17 वर्षाखालील मुलांच्या गटातील पहिल्या सामन्यात शारदा विद्यालय मंगळूरने आरव्हीके स्कूल धारवाडचा 3-2 असा पराभव केला तर पहिल्या उपांत्य सामन्यात संत मीरा अनगोळ बेळगावने स्वामी विवेकानंद स्कूल गुलबर्गा संघाचा 4-0असा पराभव केला तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात शारदा विद्यालय मंगळूरने आरव्हीके स्कूल बेगळूरचा ,3-2 असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
17 वर्षाखालील मुलींच्या पहिल्या उपांत्य सामन्यात शारदा विद्यालय मंगळूरने आरव्हीके स्कूल बेंगळूरचा 1-0 असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
तत्पूर्वी या स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे माजी आमदार अँड अनिल बेनके संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, विद्याभारती राज्य सहसचिव सुजाता दप्तरदार, संत मीरा गणेशपुर शाळेच्या मुख्याध्यापिका आरती पाटील, उद्योजक ओमकार देसाई, विद्याभारती राज्य संघटन कार्यदर्शी उमेश कुमार जी जनकल्याण ट्रस्टचे ट्रस्टी मधुकर गर्लहोसुर, सुनील तगारे,स्पोटिंग प्लॅनेट टर्फ मैदानाचे संचालक मतीन इनामदार, विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील, मयुरी पिंगट उपस्थित होते प्रारंभी पाहुण्यांचे हस्ते सरस्वती, ओमकार, भारतमाता फोटो पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.
प्रारंभी शामल दड्डीकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला यानंतर आर के कुलकर्णी सुजाता दप्तरदार चंद्रकांत तुर्कीवाडी यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यानंतर उपस्थित मान्यवरांनी मैदानावर जाऊन खेळाडूंची ओळख ,चेंडूला किक मारून स्पर्धेचे उद्घाटन केले, याप्रसंगी माजी आमदार अँड अनिल बेनके यांनी सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या याप्रसंगीत पंच
मानस नायक ,कृष्णा मुचंडी, आदित्य सानी, प्रणव देसाई, स्वयम ताशिलदार, यश पाटील शिवकुमार सुतार, ओमकार गावडे ,सागर कोलेकर, उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता पेटकर तर शामल दड्डीकर यांनी आभार मानले, या स्पर्धेत बेळगाव, धारवाड, मंगळूर, बेंगलोर, गुलबर्गा, जिल्ह्यातील 14, 17, 19 वर्षाखालील मुला-मुलींच्या संघानी सहभाग घेतला आहे.