This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

State

*आत्महत्या केलेल्या दुर्दैवी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आणि देशासाठी प्राण दिलेल्या सैनिकांच्या मुलांसाठी संपूर्ण शिक्षण मोफत*

*आत्महत्या केलेल्या दुर्दैवी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आणि देशासाठी प्राण दिलेल्या सैनिकांच्या मुलांसाठी संपूर्ण शिक्षण मोफत*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

‘बिर्ला इंटरनॅशनल स्कूल’ बेळगाव, सुरू करीत आहे एक परिवर्तनकारी योजना. आत्महत्या केलेल्या दुर्दैवी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आणि देशासाठी प्राण दिलेल्या सैनिकांच्या मुलांसाठी संपूर्ण शिक्षण मोफत देण्याची योजना, हा उपक्रम सर्वांनाच गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याबद्दलची आमची सामाजिक बांधिलकी आणि प्रतिबद्धता निर्देशित करतो.अशी माहिती बिर्ला इंटरनॅशनल शाळेच्या मुख्याध्यपकानी आज पत्रकार परिषदेत दिली.

आत्महत्या केलेल्या दुर्बल घटकांच्या व हुतात्मा सैनिकांच्या मुलांना सर्वसमावेशक सहाय्य करण्यासाठी आणि त्याचबरोबर अनाथ मुलांसाठी, आम्ही मोफत प्रशिक्षण वर्ग चालविणे, आणि त्यांना येण्या – जाण्यासाठी मोफत परिवहन सुविधा उपलब्ध करणे, या गोष्टीसुद्धा करणार आहोत. अशी माहिती दिली .

त्यानंतर त्या म्हणाल्या की दहा अनाथ मुलांसाठी आम्ही अहमदाबादच्या ‘सायन्स सिटी’ची मोफत सहल प्रायोजित करणार आहोत. याशिवाय पत्रकारांच्या अमोल कार्याची दखल घेऊन, आम्ही त्यांच्या मुलांना भरपूर शैक्षणिक सवलती देणार आहोत.

शैक्षणिक सुविधांमध्ये आमुलाग्र बदल करण्याबरोबरच, संपूर्ण शाळेला वातानुकूलित करणारी, ‘बिर्ला इंटरनॅशनल स्कूल’ ही बेळगावमधील पहिली शिक्षण संस्था ठरणार आहे.

काँग्रेस रोड, बेळगाव, येथील ‘किरण एअरकॉन’च्या सहयोगाने हवेच्या प्रदूषण नियंत्रणासह अत्याधुनिक वातानुकूलन व्यवस्था प्रत्येक वर्गामध्ये उपलब्ध केली जाणार आहे, यातून, विद्यार्थ्यांचे शारीरिक स्वास्थ्य आणि सुखद वातावरण याबद्दलची आमची प्रतिबद्धता दिसून येते.असे सांगितले

त्यानंतर डॉक्टर मनजीत जैन (शाळेचे संस्थापक) म्हणाले की, “शाळेमध्ये करण्यात आलेल्या या अमुलाग्र बदलांमधून, तसेच असाधारण सुविधा उपलब्ध करून देण्यामधून, व्यवस्थापक मंडळाचा पुरोगामी दृष्टिकोन दिसून येतो. संपूर्ण शाळेच्या वातानुकूलनाबरोबरच उत्तम शिक्षण प्रदान करण्यासाठी सर्व वर्गामध्ये नवीनतम तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्यांचे ‘स्मार्ट क्लासरूम मध्ये रूपांतर केले आहे.”

“आमच्या पर्यावरणीय अग्रसरतेला आणखी एक पाऊल पुढे नेण्यासाठी, आम्ही होळीच्या काळात पाच हजार वृक्षांचे रोपण आणि ‘सीड बॉल्स’चे वितरण करून, सभोवतालच्या निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यामध्ये सहभाग घेणार आहोत. या व्यतिरिक्त आम्ही तीन अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांना उज्वल भविष्यासाठी विविध कौशल्ये शिकविणार आहोत.

आमच्या या बहुआयामी शिक्षण पद्धतीमधून आमची शिक्षणाबाबतची आणि सामाजिक कर्तव्यांबद्दलची प्रतिबद्धताच दिसून येते. आमच्या या परिवर्तनकारी उपक्रमांमधून, विद्यार्थ्याला त्याच्या शैक्षणिक उन्नतीसाठी जरूर असलेल्या सर्व बाबी मिळतातच पण त्याबरोबरच इतर अनेक सुविधा मिळून त्यांची सर्वांगीण प्रगती होते.असे सांगितले


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24