बेळगाव:जिल्ह्यामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गुरुवार दिनांक २५/०६/२०२४ ते शुक्रवार दिनांक २६/०६/२०२४ असे दोन दिवस सुट्टी जाहीर केली आहे.
बेळगाव शहर,बेळगाव ग्रामीण,खानापूर,बैलहोंगल कित्तूर,चिकोडी,निपाणी या भागातील शाळा,कॉलेजेस व अंगणवाडी केंद्रांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.