येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत करिता आता बेळगावचे माजी जिल्हाधिकारी सुद्धा इच्छुक झाले आहेत बेळगाव जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक आयुक्त म्हणून सेवा बजाविलेले एमजी हिरेमठ हे लोकसभा निवडणुकी करिता बेळगाव मतदार संघातून भाजपच्या उमेदवारासाठी इच्छुक आहेत.
लोकांच्या मागणीवरून जनसेवा करण्याचा उद्देशाने राजकीय प्रवेश करणाऱ्या हिरेमठ यांनी नुकतीच भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांची भेट घेतली आहे मी आपण बेळगाव मतदार संघातून निवडणुकीकरिता इच्छुक असल्याचे सांगितले आहे.
आयएसआय अधिकारी हिरेमठ यांना उमेदवारी देण्या संदर्भात हाय कमांड देखील चिंतनशील असल्याचे सांगण्यात आले आहे यापूर्वी पक्षात प्रवेश करणारे आयएएस अधिकारी भास्करराव यांना भाजपने घरचा रस्ता दाखवला होता. तर आता आयएसए अधिकारी एम जी हिरेमठ यांनी देखील आपण इच्छुक असल्याचे सांगितले आहे.
एमजी हिरेमठ यांना बेळगावचा चांगला अनुभव आहे कोरोना काळात मध्ये त्यांनी लसीकरण मोहीम प्रभावी त्या राबवून बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शाबासकी दिली होती.
फक्त बेळगाव मध्ये भाजपमधून निवडणूक लढण्याकारिता एनजी हिरेमठ इच्छुक नसून त्यांच्यापाठोपाठ खासदार मंगलां अंगडी श्रद्धा शेट्टर शंकर गौडा पाटील महातेश कवटगीमठ संजय पाटील जगदीश शेट्टर हे सुद्धा इच्छुक आहेत