बेळगाव :मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील सर्व शाळा आणि पदवी पूर्व महाविद्यालयांना बुधवारी देखील सुट्टी जाहीर केली आहे. यापूर्वी सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
मात्र पावसाचे प्रमाण सातत्याने वाढत असल्यामुळे धोका लक्षात घेऊन आता ही सुट्टी बुधवारच्या दिवशी देखील वाढविण्यात आली आहे. त्यानुसार सर्व अंगणवाडी केंद्रे, पूर्व प्राथमिक शाळा, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि पदवीपूर्व महाविद्यालयांना दि. 24 रोजी सुट्टी देण्यात आली आहे.