बेळगाव : मटका प्रकरणात चौघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून दोन हजार ३५० रुपयांची रक्कम खडेबाजार पोलिसांनी गुरुवारी (ता.१) जप्त केली. बसवाण गल्ली येथील लक्ष्मीनगर परिसरात छापा घालून पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी सांगितले की, बसवाण गल्लीत मटका सुरू असल्याची माहिती मिळाली होती. यामुळे खडेबाजार पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पथक स्थापण्यात आले.
पथकाकडून गुरुवारी (ता.१) कारवाई करण्यात आली आहे. संशयितांकडून दोन हजार ३५० रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच चौघांविरोधात गुन्हाही नोंद झाला आहे. सचिन पाटील (रा. कामत गल्ली), सुनील ताशिलदार (रा. एसपीएम रोड), नारायण नायक (रा. पाटील गल्ली), हरिष तोडपडे (रा. अंजनेयगर) अशी त्यांची नावे आहेत. खडेबाजार पोलिस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे.