This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

State

*सोनाराची धारदार विळ्याने सपासप वार करून खून*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सोनाराची धारदार विळ्याने सपासप वार करून खून केल्याची चंदगड मध्ये घटना घडली. याप्रकरणी संशयित आरोपी रमेश बाबू पाटील याला चंदगड पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले.

बाळकृष्ण सोनार ( सध्या रा.तुडये, मूळ गाव कालकुंद्री ता. चंदगड, जि. कोल्हापूर वय ६०) हे सोने चांदीचे खरेदी, विक्रीचे व्यापारी आहेत. गावागावात फिरून ते सोने चांदीची विक्री करतात. रमेश बाबू पाटील (वय ४५ रा. तुडये ता. चंदगड ) या संशयीताने बाळकृष्ण सोनार यांच्याकडून काही दिवसांपूर्वी १ लाख ३० हजार रुपये उसने घेतले होते. अनेक वेळा पैशासाठी तगादा लावूनही रमेश याने पैसे दिले नाहीत.

दरम्यान मंगळवारी दुपारी १ वाजता धामणे – कर्नाटक हद्दीतून वाघजाई स्वप्नवेल पॉईंटकडे जाणाऱ्या डोंगरात मोटरसायकल वरून रमेशयाने बाळकृष्णला नेले. व मध्यस्थामार्फत आपला प्रश्न सोडवूया असे खोटे बोलून त्याला गुळम्ब गावच्या हद्दीत स्वप्नवेल पॉईंटकडे नेले. त्यानंतरघनदाट जंगलात त्यांच्यावर विळ्याने सापासप प्राणघातक हल्ला केला.

यामध्ये बाळकृष्ण गंभीर जखमी अवस्थेत पडले. घाबरलेल्या रमेशनेघराकडे पलायन केले. जखमी अवस्थेत असलेल्या बाळकृष्ण यांनीआपल्या मोबाईलवरून चंदगड पोलिसांना ही माहिती दिली. आपण कुठे
आहोत याची माहिती दिल्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचे एक पथक घटनास्थळी आणि दुसरे पथक पकडण्यासाठी तुडये येथे दाखल झाले. आणि रमेश याला पोलिसांनी अटक केली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now