This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

State

*तरुणाची निर्घृण हत्या झाल्याने घरावर तुफान दगडफेक*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तरुणाची निर्घृण हत्या झाल्याने घरावर तुफान दगडफेक

पूर्व वैमनस्यातून गोकाक येथे तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे.तरुणाच्या हत्ये नंतर तरुणाचे नातेवाईक आणि मित्रमंडळींनी संशयित आरोपीच्या आदीजांबव नगर येथील घरावर तुफान दगडफेक केली.संतप्त जमावाने काही दुचाकी आणि चार चाकी वाहनांची मोडतोड केली.

यामुळे गोकाक शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.हत्या झालेल्या तरुणाचे नाव शाहनुर पुजारी (२७) असे असून तो पेट्रोल पंपावर कामाला होता.घटनेचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी संतप्त जमावाची समजूत काढली. मारेकऱ्याला त्वरित अटक करा अशी मागणी करत शेकडो तरुणांनी पोलीस स्थानकाच्या समोर धरणे धरले होते .गोकाक मध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आल्या आहेत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now