बेळगाव : हिंदु धर्म एकत्रित रहावा व हिंदू धर्माच्या रक्षणासाठी अनेक उपक्रम राबविताना आपल्याला पहायला मिळतात. समाजाला व आपल्या युवा पिढीला हे असे उपक्रम महत्त्वाचे असून हिन्दू धर्माची जागृतीही अशा उपक्रमाने होते. सदाशिव नगर येथील मंदिरात शिवशक्ती महिला मंडळाकडून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
येथील शिवालय मंदिरमध्ये महारूद्राभिषेक घालण्यात आला असुन या कार्यक्रमाला गौरी महिला मंडल व समता भगिनी मंडळ यांचे देखिल सहकार्य लाभले आहे. या दरम्यान महामृत्युंजय जपही या महिला मंडळाकडून करण्यात आला. देव, देश, धर्मच्या रक्षणासाठी हा उपक्रम राबविला आहे. या शिवालयाची सुंदर अशी फुलांची सजावट व रांगोळी काढून या धार्मिक कार्यक्रमाची सांगता महामृत्युंजय जप व आरतीने करण्यात आली. या दरम्यान सदाशिव नगर येथील अनेक महिलाही उपस्थित होत्या.
यावेळी त्या महिलांना अल्पोपहाराची सोय देखील करण्यात आली होती. सकाळी पहाटे साडेपाचच्या दरम्यान या कार्यक्रमाला सुरुवात झाली. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिवशक्ती महिलामंडळाने पुढाकार घेतला होता. शिवशक्ती महिला मंडळातील सौ. माधुरी माळी, सौ. सुमन पाटील, सौ. रेणुका राणे, सुरेखा राणे, अंजली गाडगीळ, सौ. किर्ती दरवंदर, ॠतुजा पाटील यांचे सहकार्य लाभले व सदाशिव नगरातील अनेक महिला उपस्थित होत्या. सौ. माधुरी माळी यांनी सर्वांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता केली.