This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*ई व्ही एम मशीन बद्दल खोट्या अफवा पसरवून काँग्रेसने भारताच्या लोकशाहीला बदनाम करत आहे*

*ई व्ही एम मशीन बद्दल खोट्या अफवा पसरवून काँग्रेसने भारताच्या लोकशाहीला बदनाम करत आहे*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

काँग्रेसने कोरोना,एच ए एल आणि आता ई व्ही एम मशीन बद्दल खोटे पसरवण्याचे काम केले.ई व्ही एम मशीन बद्दल खोट्या अफवा पसरवून काँग्रेसने भारताच्या लोकशाहीला बदनाम केले आहे.पण आता सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसला चांगली चपराक दिली आहे.देशाचे नुकसान होणाऱ्या गोष्टी बद्दल खोटे पसरवण्याचे काम काँग्रेस कोणाच्या सांगण्यावरून करत आहे ?ई व्ही एम मशीन बद्दल खोटे बोलून देशाच्या लोकशाहीला बरबाद करण्याचे षडयंत्र काँग्रेसने रचले.यासाठी काँग्रेसने संपूर्ण देशाची माफी मागायला हवी अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेळगाव येथील भाजप उमेदवारांच्या भव्य प्रचार सभेत केली.

बेळगाव आणि चिकोडी लोकसभा मतदार संघातील जगदीश शेट्टर आणि अण्णासाहेब जोल्ले या भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मालिनी सिटी येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती.

व्होट बँकसाठी देशाचा स्वातंत्र्यलढा आणि तुष्टीकरणाचा वापर काँग्रेस करत आहे.काँग्रेसचे शहजादे भारताच्या राजा महाराजांना शिव्या देऊन त्यांचा अपमान करत आहेत.काँग्रेसला देशाच्या हिताशी काही देणेघेणे नाही.जहा काँग्रेस आयी वहा बरबादी लायी अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर केली.भाजप देशाचे हित साधत असताना काँग्रेस देश हितापासून दूर गेली आहे.काँग्रेस परिवार हितात गुंतून पडली आहे असेही मोदी म्हणाले.सभेला लाखाहून अधिक लोक उपस्थित होते. बेळगाव आणि चिकोडीच्या बंधू भगिनींना नमस्कार अशी कन्नड भाषेत मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.व्यासपीठावर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24