डोक्यात काठीने वार करून तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना कॅम्प परिसरात घडली आहे.गणेश प्रकाश कांबळे वय 29 राहणार तेलगू कॉलनी मोची गल्ली कॅम्प असे अरुणाचे नाव असून त्याचा मित्र त्याच गल्लीतील तरुण मंजुनाथ नायक वय 20 यांनी त्याचा खून केला आहे.त्याच्यावर कॅम्प पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
गणेश आणि तरुण हे दोघेही एकाच गल्लीतील रहिवासी असून ते मित्रही होते. यावेळी तरुण गणेशच्या घरी गेला होता त्या ठिकाणी दोघांमध्ये वादावाद झाली.
यावेळी रागाच्या भरात तरुणाने गणेशच्या डोक्यात काठीने वार केला. वार वर्मी लागल्याने तो जागीच ठार झाला गणेश वर झालेला हल्ला त्याच्या मोठ्या काकाने पाहिला.खुनाची घटना उघडकीस येताच गल्लीत एकच गोंधळ उडाला. या घटनेची नोंद कॅम्प पोलिस स्थानकात झाली आहे.