बेळगाव : तलावाजवळील झाडाला तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. ५) पहाटे सहाच्या सुमारास तुरमुरीत (ता. बेळगाव) उघडकीस आली. सहदेव मारुती डोंबले (वय ३६, रा. वेंगुर्ला रोड, तुरमुरी) असे मृताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, मृत सहदेव व त्याच्या पत्नीमध्ये कौटुंबिक कलह सुरू होता. यातून तक्रार करून पत्नी काही दिवसांपूर्वी माहेरी गेली होती. यानंतर तिने पतीला वकिलामार्फत नोटीस पाठवली. ही बाब मनाला लावून घेतल्याने सहदेवची मानसिक स्थिती बिघडली होती. यातूनच तो सोमवारी पहाटे चारच्या सुमारास घरातून बाहेर पडला. घरापासून काही अंतरावर असलेल्या तलावाजवळील काजूच्या झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. याप्रकरणी त्याचे वडील मारुती लक्ष्मण डोंबले यांनी वडगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी तपास करीत आहेत.