कित्तुर उत्सवच्या ज्योतीचे बेळगांव मध्ये स्वागत
लिंगायत पंचमसाली संघटनेच्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली ७०-८० लोकांनी एकत्र येऊन कित्तूराराणी चन्नम्मा यांच्या १९५ व्या स्मरणार्थ चन्नम्माच्या जन्मस्थान काकती येथून ज्योत यात्रा काढली. काकती गावातून निघालेली ज्योत यात्रा चन्नम्मा सर्कल येथे पोहोचली यावेळी ज्योत चे स्वागत करून चन्नम्मा च्या पुतळ्याला पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .आणि नंतर बागेवाडीकडे ज्योत निघाली.
बसव जय मृत्युंजय स्वामीजी यांनी चन्नम्मा सर्कल येथे चन्नम्माच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून पत्रकारांशी बोलताना सांगितले की, महानगरपालिकेने शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या चन्नम्मा सर्कलचा विकास करून किल्ला तलावाच्या मध्यभागी चन्नम्मा मूर्ती बसवावी.
यावेळी किरण सदुनावर, महांतेश वाकुंदा, माजी आमदार संजय पाटील,नगराध्यक्ष व उपमहापौर, राजशेखर तलवार वाल्मिकी समाजाचे नेते दिपक गुडुगनट्टी, करावे जिल्हाध्यक्ष आर.के.पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.