पुढील महिन्यात होणाऱ्या श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त सांबरा येथील मंदिरामध्ये देवस्थान कमिटी, यात्रा कमिटी आणि हकदार यांच्यावतीने ओटी भरून पूजा करण्यात आली.
धनगरी वाद्य, कामान्ना गल्ली वाद्य आणि कोरवी वाद्याच्या गजरात गावातील सर्व मंदिरामध्ये धार्मिक विधी करण्यात आले. दुर्गादेवी मंदिरात पूजा करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर रेणुका, हनुमान , बनशनकरी , मातंगी , भैरीदेव, बसवण्णा , महादेव, बिरदेव, मुरमुक्तावा, कलमेश्वर, विठ्ठल रुक्मिणी आदी मंदिरात पूजा करण्यात आले. सायंकाळी प्रथेप्रमाणे बाळेकुंद्री येथील महालक्ष्मी देवीची ओटी भरून पूजा करण्यात आली. देवस्थान कमिटी, यात्रा कमिटी आणि हकदार सहभागी झाले होते.