गॅलिलीओ क्लब च्या वतीने विद्यार्थी वर्ग आणि सामान्य नागरिक यांना विज्ञान आणि खगोलशास्त्रा विषयी सखोल माहिती देणारे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात, मे महिन्याची 3 (तीन) तारीख झीरो शाडो डे म्हणजे छाया विरहीत दिन मानला जातो याचे औचित्य साधून आज 12 वाजून 29 मिनीटानी काॅलेज परिसरातील श्री पु ल देशपांडे खुल्या रंगमचाच्या परिसरात विद्यार्थ्यानी उभ्या खांबाच्या भवती (मानवी साखळी)गोलाकार करून,छाया विरहीत वेळेचे सजीव प्रात्यक्षिके दिली.
या सोहळ्यास श्री अशोक शानभाग, श्री ज्ञानेश कलघटगी, प्राचार्य एस एन देसाई,उपप्राचार्य सचिन पवार, प्रा प्रवीण पाटील, प्रा विनय कुलकर्णी, प्रा अभिजीत गवस,प्रा पुरेकर उपस्थित होते.
श्री अशोक शानभाग यांनी सर्व विद्यार्थी वर्गास या दिनाचे महत्व सांगितले.
श्री प्रकश शानभाग यांनी झीरो शाडो डे याचा खगोलशास्त्रीय आणि वैज्ञानिक संबध याचा सखोल परिचय करून दिला.आशा प्रकारच्या वैज्ञानिकीय कार्य शाळेचे आयोजन करून विद्यार्थ्यी वर्गात कुतुहल निर्माण करणे आणि त्याच्या नवीन विषयाची माहिती एकत्रीत करण्याची आवड निर्माण करण्याचे काम गॅलिलीओ क्लबचे सर्व प्राध्यापक सदस्य करत असतात.