मजदूर नवनिर्माण संघाच्या वतीने काळेनट्टी गावच्या महिलांचा रोजगारासाठी मार्कंडेयनगर पंचायतीला घेराव. –
मार्कंडेयनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या काळेनट्टी गावामध्ये जास्ती संख्येने दलीत समाजाची गरीब कुटुंबे रहातात. गावातील या गोरगरीब कष्टकरी महिलांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा कायदा (2005) आल्यापासून आजतागायत (2024) मार्च महिना अर्धा झालातरी मार्कंडेयनगर ग्रामपंचायतीमार्फत मनरेगा अंतर्गत काम मिळालेले नाही. काळेनट्टी गावातील या दलीत गरीब महिलांनी याअगोदर दोन/तीन वेळा कागदपत्रे देऊन पंचायतीतकडे रोजगाराच्या कामाची मागणी केलेली होती, पण सदर पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी कामात कूचराई दाखवत महिलांना कामापासून का वंचित ठेवले, याचा जवाब द्यावा लागेल.
यासंदर्भात ‘मजदूर नवनिर्माण संघाच्या’ राहुल पाटील यांना माहिती कळताच त्या काळेनट्टीला भेट दिली., यावर त्यांनी काळेनट्टी गावात येऊन गोरगरीब महिलांची बैठक घेतली व त्यांच्या समस्या ऐकून सोडवून काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
आज दि. 18/03/2024 रोजी काळेनट्टी गावातील महिलांना घेऊन रोजगार मिळवून घेण्यासाठी ‘मजदूर नवनिर्माण संघाच्या’ माध्यमातून मार्कंडेय नगर ग्रामपंचायतीला घेराव घातला. यावेळी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी करत तातडीने रोजगाराचे काम उपलब्ध करून देण्याची मागणी केली. महिलांनी पंचायतीच्या पिडीओंच्या अनूपस्थितीमूळे सेक्रेटरी गुरव व क्लार्क या अधिकाऱ्यांना निवेदन दिले व लवकरात लवकर काम उपलब्ध करून देण्याची विनंती केली.