समितीच्या वतीने शुक्रवारी मिरवणुकीने दाखल करणार नामांकन
बेळगाव: महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोकसभेचे उमेदवार महादेव पाटील यांचा उमेदवारी अर्ज शुक्रवार दि. 19 रोजी शक्ती प्रदर्शनाने दाखल करण्यात येणार आहे.
बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौकातून शुक्रवारी सकाळी दहा वाजता मिरवणुकीने जिल्हाधिकारी कार्यालयांकडे आज दाखल करण्यात येणार आहे बेळगाव सहज सीमा भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आजी-माजी लोकप्रतिनिधी विविध सामाजिक संस्था संघटनांनी उपस्थित रहावे असे आवाहन शहर महाराष्ट्र समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील आणि तालुका मराठी ग्राम समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी केले आहे.