कित्तूर कर्नाटक आणि कल्याण कर्नाटकासह राज्यभरातील सर्व 28 लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी डॉ बी.आर. आंबेडकर फेडरेशन ऑफ दलित संघटनांच्या वतीने मतदारांना आवाहन करून काँग्रेसला मतदान करण्याची विनंती केली .
राज्यभरातील कित्तूर कर्नाटक आणि कल्याण कर्नाटकासह सर्व लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांना बाह्य समर्थन देण्यासाठी युनियनच्या राज्य समितीद्वारे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी ही माहिती देण्यात आली.
यावेळी काँग्रेसला व इंडीया गट बंधनला आपली संघटना पाठिंबा देत असल्याची माहिती देण्यात आली असून बेळगाव आणि चिक्कोडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर आणि प्रियंका जारकीहोळी यांना मतदान करण्याची मागणी यावेळी पत्रकार परिषदेत दलित संघटनेने केली.
यावेळी संघटनेचे संस्थापक राज्याध्यक्ष श्रीधर कलिविर, राज्य कार्याध्यक्ष एम गोविंद राजू, राज्य संचालक एम गुरुमूर्ती शिवमोग्ग, राज्य गोपाल डीसी, राज्यकार्यदर्शी वी गोपाल, मल्लेश चौगुले ,सुरेश तळवार, दुर्गेश मैत्री, सिद्धप्पा कांबळे, महादेव तळवार , महांतेश तळवार, सिद्धू कुरंगी, निंगाप्पा कांबळे ,आर.टी. राठोड, वकील जगदीश सावंत, विशाल चौगुले उपस्थित होते.