कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या हरित क्रांती सेनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी भर पावसात निवेदन स्वीकारून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
वीर राणी कित्तूर चन्नमा चौकातून निघालेल्या मोर्चात जिल्ह्यातून आलेले शेतकरी सहभागी झाले होते.जय जवान जय किसान , शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी शेतकऱ्यांनी केली.पावसात भिजत शेतकऱ्यांनी मोर्चा काढला.स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा,देशातील सगळ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा,कर्नाटकात भाजप सरकारने लागू केलेले तीन अन्यायी कृषी कायदे रद्द करा,
कळसा भांडुरा प्रकल्प लवकर सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली.जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी भर पावसात निवेदन स्वीकारून त्यांच्याशी संवाद साधून शक्य तितक्या लवकर मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले.कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या हरित क्रांती सेनेचे राज्याध्यक्ष चंद्रशेखर कोडीहळी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता.