बेळगाव : मोहम्मद रोशन यांनी आज शुक्रवारी (५ जून) बेळगावचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला.मावळते जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते मोहम्मद रोशन यांनी पदभार स्विकारला.
I.A.S च्या 2015 बॅचचे,मोहम्मद रोशन यांनी यापूर्वी हेस्कॉमचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्य केले आहे.
बी.टेक आणि एमबीए (वित्त), एमए (पब्लिक पॉलिसी) पदवीधर असलेल्या मोहम्मद रोशन यांनी हावेरी आणि उ.कन्नड जिल्हा पंचायतींचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम केले आहे.
<span;> गेल्या दोन वर्षांपासून (५-५-२०२२) बेळगावचे जिल्हाधिकारी म्हणून प्रशासनात महत्त्वपुर्ण कार्य केलेल्या नितेश पाटील यांची सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाच्या संचालकपदी बदली करण्यात आली आहे.
बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी मावळते जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी त्यांनी नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.प्रोबेशनरी I.A.S. दिनेशकुमार मीना, अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी आदी उपस्थित होते.