बेळगाव:श्री शनेश्वर एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटी बेळगाव या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व संचालकांनी नवनिर्वाचित लोकसभा संसद (एम.पी) श्री जगदीश शट्टर यांची सर्किट हाऊस येथे विशेष भेट घेतली. भाजप नेते किरण जाधव यांनीही भेट घडवून आणली. प्रारंभी उपाध्यक्ष प्रा अनिल चौधरी यांनी शाल अर्पण करून जगदीश शट्टर यांचे स्वागत करून अभिनंदन केले. संजय भावी यांनी हार अर्पण केला. शिवराज पाटील यांनी मिठाई दिली. तर संस्थेतर्फे श्री शनेश्वराची प्रतिमा आणि निवेदनाची फाईल देण्यात आली. सदर भेट प्रसंगी आमदार श्री रमेश जारकीहोळी हेही उपस्थित होते.
जगदीश शट्टेर यांना सोसायटीच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्यात आला संस्थेतर्फे राबविण्यात जाणाऱ्या विविध योजनांची माहिती चौधरी यांनी दिली संस्थेने नुकताच खरेदी केलेल्या जागेवर होणाऱ्या नियोजित बांधकामाचा आराखडा आणि खर्चाचा तपशील सादर करण्यात आला. खासदार साहेबांनी सर्व बाबी तपशिलावर जाणून घेतल्या सर्व माहिती विचारून घेतली. नंतर फाईल बद्दल लवकरात लवकर निर्णय घेऊन मोठा निधी देण्याचे आश्वासन दिले.
याशिवाय तहसीलदार गल्लीतील रेल्वे पुला बद्दल ही महत्त्वाच्या सूचना मांडून एक योजना कथन करण्यात आली.या योजनेबद्दलही खासदार साहेबांनी कुतूहल पूर्वक विचार विमर्श करून लवकरच या भागाला भेट देणार असल्याचे सांगितले.
एकंदर या चर्चेमध्ये प्रा.अनिल चौधरी,संजीव भावी,शिवराज पाटील, महांतेश देसाई, श्रीमती गीता कट्टी, यांनीही भाग घेतला तसेच याप्रसंगी भाजप नेते किरण जाधव आणि विकास कलघडगी हेही उपस्थित होते.