राष्ट्रीय समाज पक्ष आठ लोकसभा मतदारसंघात उमेदवार करणार उभे
राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष एस.एल.अक्की सागर यांनी बेळगाव येथील कन्नड साहित्य भवन येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाने 8 मतदारसंघात निवडणूक लढवत आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाने महाराष्ट्रात एनडीए आघाडीशी हातमिळवणी केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीदरम्यान आमच्या पक्षाला एक जागा मिळाली आहे, त्याशिवाय आम्ही 6 ते 7 राज्यात स्वतंत्र निवडणुकांना सामोरे जात आहोत.
कर्नाटक राज्यातील 8 मतदारसंघातील निवडणुकीसाठी आम्ही चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाप्रमाणेच बेळगाव आणि चिक्कोडी येथेही उमेदवार उभे करणार आहोत, असे सांगितले .चिक्कोडी मतदार संघाकरीता सतीश सनदी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार लवकरच जाहीर करणार आहोत.गेल्या पाच महिन्यांपूर्वी कुरुब समाजाच्या अधिवेशनात काँग्रेस नेत्यांनी बेळगाव जिल्ह्यात कुरुब समाजातील उमेदवार देण्याची घोषणा केली होती मात्र ती घोषणा आता केवळ आश्वासनच राहिली आहे, त्यामुळे कुरुब समाजात नाराजी व असंतोष आहे.
त्यामुळे आमचा पक्ष बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी कुरुब समाजाचा उमेदवार उभा करण्याचा विचार करत आहे.असे सांगितले .याप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्ष कर्नाटक प्रदेशाध्यक्ष धर्मण्णा थोंटापूर राष्ट्रीय समाज पक्ष बेळगावचे प्रभारी
बलराम कामनावरा व चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे सरचिटणीस सतीश सनदी उपस्थित होते.