जिल्हा पंचायत सीईओ हर्षल भुयार यांच्या कार्याचे कौतुक
बेळगांव: दलीत संघर्ष समिती आंबेडकर वादच्या वतीने 8 दिवसापूर्वी दलीत समाज साठी चालु केलेली विविध कामे लवकर पूर्ण करून द्या अशी मागणी जिल्हा पंचायत सीईओ कडे करण्यात आले होते.त्या निवेदनाला मान देत जिल्हा पंचायत सीईओ हर्षल भुयार यांनी ती सर्व कामे पूर्ण केली.
याकरिता दलित संघर्ष समिती आंबेडकर वादचे राज्य संघटना संचालक सिद्धाप्पा कांबळे यांच्या नेतत्वाखालील बेळगाव जिल्हा पंचायत चे सीईओ हर्षल भुयार यांनी लवकर कामे मार्गी लावल्यामुळे सत्कार करण्यात आला .सिद्धाप्पा कांबळे, दलित नेते मल्लेश चौगुले जिल्हा अध्यक्ष महांतेश तलवार यांच्या हस्ते शाल व पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला.
जिल्हा पंचायत सीईओ हर्षल भुयार यांनी जिल्ह्यातील दलित समाजाच्या ज्या काही समस्या असतील त्या मी सोडविण्याचे प्रयत्न करीन असे आश्वासन त्यांनी दिले.
याप्रसंगी,भाऊराव गडकरी ,दीपक धबडे, अनिल कांबळे, आनंद कोलकार,संतोष कांबळे , यल्लाप्पा हुदली यांच्या सहित दलीत संघर्ष समिती आंबेडकर वाद चे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.