बेळगांव:आज कन्नड साहित्य भवन मध्ये रंगसंपदा नाट्यसंस्थेतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी या पत्रकार परिषदेत श्री मंत्रालय राघवेंद्र स्वामी यांच्या जीवनावर आधारित नाटकाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
त्यावेळीस सदर नाटक 13 आणि 14 एप्रिल रोजी कोनवाळ गल्ली येथे लोकमान्य रंगमंदिरात पार पडणार आहे यावेळी श्री राघवेंद्र स्वामीची यांच्या जीवन कथेवर आधारित परिमाधव्वरू हे नाटक दाखविण्यात येणारअसल्याची माहिती देण्यात आली.
तसेच यावेळी या पत्रकार परिषदेत नाट्यप्रयोगाच्या प्रचार पत्रकाचे अनावरण देखील करण्यात आली याप्रसंगी या पत्रकार परिषदेस दिलीप माळवी प्रसाद कारजोळ रामचंद्र कट्टी चिदानंद वागळे उपस्थित होते.