अपटेक एव्हिएशन अँड हॉस्पिटल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या कौतुक समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. च अपटेकच्या विद्यार्थ्यांची गोवा येथील फाईव्ह स्टार ताज हॉटेलमध्ये एक्झिक्यूटिव्ह पदी निवड झाली असल्याने विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा गोंधळी गल्ली येथील अपटेक एव्हिएशन मध्ये पार पडला.
या कौतुक समारंभास अपटेक एव्हिएशनचे व्यावसायिक भागीदार विनोद बामणे सरस्वती इन्फोटेकच्या व्यवस्थापकीय संचालिका ज्योती बामणे सह विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
अपटेक एव्हिएशनचे विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी अटॅकचे नाव उज्वल करत असतात याचेच ज्वलंत उदाहरण सध्या पहाव्यास मिळाले असल्याचे मत यावेळी विनोद बामणे यांनी बोलताना व्यक्त केले.
तसेच सर्व विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने मुलाखतीला सामोरे जावे आणि आपल्या इन्स्टिट्यूट बरोबरच आपल्या आई वडिलांचे नाव देखील उज्वल करावे अशा शुभेच्छा यावेळी त्यांनी बोलताना दिल्या.
यावेळी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पार पडला. याप्रसंगी अपटेकचे विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते