बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील मलबाड गावात शेळ्यांना पाणी देण्यासाठी शेत तलावात जात असताना एका मुलगी पाय घसरून पाण्यात पडल्याने तिचा मृत्यू झाला आहे.
बकऱ्यांचे कळप राखण्यासाठी गेलेल्या मलबाड गावातील अन्विता सत्यप्पा खोत हिला वाचवण्यासाठी गेलेले भाऊ आण्णाप्पा विठ्ठल खोत हेही जागा न सापडल्याने पाण्यात बुडाले. यावेळी नागरिकांनी दोघांना तातडीने वर काढण्यात आले मात्र तोपर्यंत अन्विता खोत या मुलीला आपला जीव गमवावा लागला .या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.