कर्नाटकात काँग्रेसची आपल्या हमी योजना राबतेय आणि भाजपचे चोंबू मॉडेल राज्यात लोकसभा निवडणूकच्या पार्शवभूमीवर खोटी आश्वासने देतेय असे प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांनी म्हटले आहे.
बेळगावात पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, मोदी सरकारचा अजेंडा राज्याचा बदला घेण्याचा आहे. भाजप सरकारने कन्नडिगांवर अन्याय केला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या अधिकारावर गदा येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कर्नाटकच्या मातीत पाय ठेवला नाही. शहा आणि मोदी राज्यात आल्यास गो बॅक चा नारा द्यावा अशी टीका त्यांनी केली आहे.