हायकमांडने दिली सूचना लोकसभा निवडणुकीच्या तयारीची: मंत्री सतीश जारकिहोळी
बेळगावात आज प्रसारमाध्यमांशी बोलताना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आठवड्यात तीनवेळा दिल्लीवारी केल्याबद्दलच्या पत्रकारांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी ते म्हणाले की लोकसभा निवडणुकीची तयारी करण्याची सूचना हायकमांडने केली आहे.
त्यानंतर त्यानी काँग्रेस श्रेष्ठींनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या.तमागील निवडणुकीप्रमाणे तयारी करू, सगळ्या इच्छुकांशी चर्चा करू. आपणाला लोकसभा लढण्याची सूचना दिलेली नाही. कोणी मागणी केली नाही किंवा दबाव आणलेला नाही. केवळ तयारी करण्यास सांगितले आहे असे सांगितले .
गेल्यावेळी प्रमाणे इच्छुकांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेऊन उमेदवार निश्चित करण्यात येतील अशी माहिती बोलताना दिली .तसेच नंतर ते म्हणाले निवडणुकीला अजून दहा महिने आहेत, येईल तेंव्हा पाहू असे त्यांनी सांगितले.त्याचबरोबर अद्याप आपल्याला लोकसभा निवडणूक लढविण्याची सूचना पक्षश्रेष्ठींनी दिली नसल्याचे सांगून मंत्री सतीश जारकीहोळी यांनी याबाबत गौप्य राखले आहे.
un1y13
91jjut
xz8vhc