बेळगाव : ज्यांच्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समिती मजबूत आणि एकसंघ राहिली अश्या अनेक कार्यकर्ते जेष्ठ नेते आणि मराठी भाषिकांच्या भेटी गाठी घेण्यास महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोकसभा उमेदवार महादेव पाटील यांनी सुरुवात केली आहे.
बेळगाव तालुक्याच्या मानबिंदू असलेल्या मार्कंडेय साखर कारखान्याचे अध्यक्ष तानाजी पाटील यांची कंग्राळी खुर्द येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतला व पाठिंबा मिळवला या शिवाय सुभाष फोटोचे मालक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे जेष्ठ मार्गदर्शक सुभाष ओऊळकर यांचीही सदिच्छा भेट घेतली यावेळी दोन्ही नेत्यांनी महादेव पाटील यांना मतदान करून सीमा वासियानी दिल्लीला मराठी बाणा दाखवावा असे आवाहन केले.
बेळगाव बार असोसिशनचे माजी अध्यक्ष सुधीर चव्हाण, मराठा समाजाचे नेते गोपाळराव बिर्जे, माजी कुस्ती खेळाडू विलास घाडी यांचीही भेट घेऊन आशीर्वाद मिळवला.