This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Politics

*युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयकपदी अभिषेक अवचार यांची निवड*

*युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयकपदी अभिषेक अवचार यांची निवड*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या युवक धोरण व संशोधन समितीच्या राष्ट्रीय समन्वयक पदी महाराष्ट्रातुन अभिषेक वसंतराव अवचार यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे . युवक काँग्रेसचे केंद्रीय प्रभारी कृष्णा अल्लूवरू, राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही यांच्या निर्देशाने रिसर्च डिपार्टमेंटचे अध्यक्ष विकास यादव यांनी अभिषेक अवचार यांची नियुक्ती राष्ट्रीय समन्वयक पदी केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, मा सोनिया गांधी, मा .राहुलजी गांधी व श्रीमती प्रियंका गांधींच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील लोकसभा व विधानसभा मतदारसंघाच्या विश्लेषणाची तसेच विद्यापीठ स्तरावरील युवक धोरण तयार करण्याची जबाबदारीअभिषेक अवचार यांचेवर सोपवण्यात आली आहे.

अभिषेक अवचार उत्कृष्ठ कवी , शायर असुन त्यांचे हे साहित्य मराठी व हिन्दी भाषेत प्रकाशित झाले आहे . शिव शाहु फुले आंबेडकर गांधी नेहरु विचारांचे ते पाईक असुन काँग्रेसी विचारधारा तळागाळात रुजवण्यासाठी ते सतत प्रयत्नरत असतात . अवचार यांनी दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या निवडणुक प्रचाराची धुरा सुध्दा यशस्वीपणे सांभाळली होती . ते सध्या भारत – तिबेट मैत्री संघाचे राष्ट्रीय सचिव म्हणुन कार्यरत आहेत . उत्कृष्ठ वक्ते असलेले अभिषेक यांची युवा राष्ट्रकवी म्हणुन देशभर त्यांची ओळख आहे .

राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस पक्षाचे युवक धोरण व संशोधन समितीच्या समन्वयक पदी निवड होणे ही माझ्यासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे . सामाजिक ,राजकीय, शैक्षणिक व आर्थिक प्रश्नांची जनजागृती करून ही सांस्कृतिक चळवळ जनमानसात रुजवण्याकरिता देशभरात कार्यरत राहणार आहे . तसेच गौतम बुद्ध ,महावीर, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरूंचे विचार युवकांनी स्वीकारून भारत देशाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या मा. राहुल गांधी यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहु . अशा भावना अभिषेक अवचार यांनी या प्रसंगी बोलतांना व्यक्त केल्या.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24