लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना युवा सेनेच्या युवकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.
सीमाभागातील मराठी बांधवांच्या हक्कासाठी तसेच मराठी भाषा व संस्कृती टिकावी यासाठी बेळगावची शिवसेना युवासेना नेहमी अग्रेसर असते. त्याचप्रमाणे प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीमध्ये युवा सेनेचे युवक महत्त्वाची भूमिका निभावत असतात. या पार्श्वभूमीवर मराठी स्वाभिमान जपत यावेळी लोकसभा निवडणुकीकरिता शिवसेना युवा सेना बेळगावने महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांना आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.