चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरला भेट देऊन तेथे प्रशिक्षण घेणाऱ्या अग्निविरांशी संवाद साधला.
कृत्रिम बुद्धिमत्ता,सायबर वॉरफेअर यामुळे संरक्षण दलाच्यासमोर वेगवेगळी आव्हाने आहेत.त्यामुळे नवे नवे तंत्रज्ञान अग्निविरानी शिकायला पाहिजे. अग्निविरानि लष्करी पेशा स्वीकारला ही अभिमानाची बाब आहे.सैनिक आणि त्याच्या कुटुंबीयांना सदैव वेगवेगळ्या आव्हानांचा ,कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो.पण या साऱ्या आव्हानांना सामोरे जावून सैनिक देशाचे रक्षण करतात.अग्निविर सुद्धा हे आव्हान स्वीकारतील असा विश्वास चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी अग्निविरांशी संवाद साधताना व्यक्त केला.
अग्नीविर हे केवळ सैनिक नसून त्यांच्यामध्ये नेतृत्व,संशोधन आणि देश रक्षणाची क्षमता आहे.लष्करी सेवा ही उत्तम सेवा असून सगळ्या अग्निविरांचे मी अभिनंदन करतो असे उदगार चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी काढले.
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षण सुविधांना भेट देऊन जनरल अनिल चौहान यांनी समाधान व्यक्त केले.मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी जनरल अनिल चौहान यांचे स्वागत करून अग्निविराना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाची माहिती दिली.