This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsNationalPolitics

*जगदीश शेट्टर यांनी पावणे दोन लाखाहून अधिक मतांनी विजय मिळविला*

*जगदीश शेट्टर यांनी पावणे दोन लाखाहून अधिक मतांनी विजय मिळविला*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव लोकसभा मतदार संघात भाजपचे जगदीश शेट्टर यांनी पावणे दोन लाखाहून अधिक मतांनी विजय मिळवला.काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांचा पराभव झाला.जगदीश शेट्टर यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली ती त्यांनी शेवटच्या फेरीपर्यंत टिकवून ठेवली.जगदीश शेट्टर यांना लाखाहून अधिक मताची आघाडी मिळाल्यावर त्यांच्या समर्थकांनी विजयोत्सव सुरू केला.भाजप कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून,फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. जगदीश शेट्टर यांना ७५६४७१ मते तर त्यांचे कोंग्रेसचे निकटचे प्रतिस्पर्धी मृणाल हेब्बाळकर यांना ५८०८९७ मते मिळाली.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना बेळगाव लोकसभा मतदार संघाचे तिकीट जाहीर झाले त्यावेळी भाजप मधील नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता.त्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी बेळगाव मधील भाजप नेते आणि कार्यकर्ते यांचे कान टोचल्यावर नाराजी दूर झाली होती.कर्नाटकच्या महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल हे काँग्रेस तर्फे निवडणुकीच्या रिंगणात होते.

लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपली संपूर्ण ताकद निवडणुकीत लावली होती.पण भाजप कार्यकर्त्यांच्या नियोजनबध्द प्रचार आणि जारकीहोळी बंधुंनी शेट्टर यांच्यासाठी ताकद लावल्यामुळे मृणाल हेब्बाळकर यांना पराभव पत्करावा लागला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24