This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Politics

*लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेतली  माघार*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेतली  माघार

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने ग्रामीण मतदार संघातून लक्ष्मी हेब्बाळकर यांनी माघार घेतली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरिता दुपारी तीन वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील रामनगर कंग्राळी येथील रहिवासी असलेल्या लक्ष्मी मनोहर हेबाळकर यांनी यांनी माघार घेतली आहे.

रामनगर कंग्राळी येथील रहिवासी असलेल्या लक्ष्मी हेबाळकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र आता त्यांनी आपला शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

ग्रामीण मतदार संघातून दोन नावाच्या व्यक्ती निवडणूक लढवीत असल्याने नागरिकांमध्ये खूप मोठा संभ्रम निर्माण झाला होता. एक काँग्रेसच्या विद्यमान आमदार लक्ष्मीताई हेबाळकर आणि दुसऱ्या अपक्ष उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर या दोघांचीही नावे सारखे असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

तसेच ग्रामीण मतदारसंघातून लक्ष्मी हेबाळकर या नावाच्या दोन महिलांनी अर्ज दाखल केल्याने गैरसमज निर्माण झाला होता. पण आता अपक्ष उमेदवार लक्ष्मी हेबाळकर यांनी अर्ज मागे घेतला असल्याने आता नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24