काँग्रेसने वारंवार भारतीय राज्य घटनेचा अवमान केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी यांनी देशातील जनतेची माफी मागावी यासाठी भाजप तर्फे काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढून घेराव घालण्याचा प्रयत्न केला.यावेळी पोलिसांनी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
काँग्रेस नेत्यांनी घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाचा अवमान केला आहे.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तर देशात आणीबाणी लागू करून लोकशाहीची हत्या केली.लाखो लोकांना तुरुंगात टाकले होते.आजवर काँग्रेस नेत्यांनी या बाबत जनतेची माफी मागितली नाही.भाजप संविधान बदलणार म्हणून आरोप करणाऱ्या काँग्रेस पक्षानेच वेळोवेळी घटना दुरुस्ती केली असा आरोप भाजप नेत्यांनी आंदोलनाच्या वेळी केला.भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवून ताब्यात घेतले.