बेळगाव :तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक येथे मराठा कॉलनी सिंडिकेट बँक समोर आज दुपारी शेतकऱ्यांनी ठेवलेल्या गवतगंजीला आग लागून जाळून खाक झाल्या आहेत.यामध्ये शेतकऱ्यांच्या 6 गवतगंजित जळून खाक झाले असल्याची माहिती आहे.
तरी वेळेत अग्निशामकच्या जणांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली , यामध्ये चेतन चव्हाण, संजय पाटील, गणपत निलजकर,परशुराम पाटील, अष्टेकर या शेतकऱ्यांचे जवळ जवळ १ लाख रुपया पर्यंतचे नुकसान झाले आहे.
अद्याप आग कशामुळे लागली याचे मूळ कारण समजू शकले नाही.