बेळगांव:लोकराजा छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या काळामध्ये अनेक समाजसुधारणेचीं कामे केली आहेत.
आरक्षण देणारा पहिला राजा,जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना १ रु. दंड ठोकवणारा राजा,कला,संस्कृती, क्रिडा, शिक्षण यांना प्राधान्य देणारा राजा अंधश्रद्धा, कर्मकांड, दैववाद यावर प्रहार कणारा राजा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी जाऊन सन्मान करणारा राजा, सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज होय.
तसेच शाहू महाराजांनी शिक्षणा सह मागासवर्गीयांना अस्पृश्यता निर्मूलन आणि सत्तेत समान वाटा आणि सामाजिक स्थिती त्यांचा आदर्श घेऊन दि.26/06/2024 रोजी श्री बाळकृष्ण दुडाप्पा कोलकार व विना बाळकृष्ण कोलकार यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी व चांगल्या शिक्षणासाठी व वंचितांसाठी स्वतःचे निलाजी मधील राहते घर निलजी ग्रामपंचायतला दान करून समाजा समोर धानशूर पणाचा एक नवा आदर्श घालून दिला आहे.
यासाठी छत्रपती यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा सरकार करण्यात आला.त्यांनी जी.एस.एस.महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवा बजावली असून ते सद्या निवृत्त होणार आहेत.ते स्वतः शिक्षणाचे महत्त्व चांगल्या प्रकारे जाणतात म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले त्या बद्दल आम्ही निलजी ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
याप्रसंगी आकाश हलगेकर,श्री.दिपक केतकर,श्री.सुनिल कोलकार,श्री.श्रीनिवास कोलकार,श्री.अनिकेता पाटील,श्री. सुधीर एडुरी,श्री. ईश्वरा काखीमणी,श्री विशाल कुमार,त्यांच्या उपस्थितीत
मा.श्री बाळकृष्ण कोलकार सर यांचा सत्कार करण्यात आला.